सगळ्यात सोपं फिजिक्स – भौतिकशास्त्र – पदार्थ विज्ञान


मित्रांनो, विज्ञान विषय म्हटला कि कुणालाच नकोसा वाटतो; त्यात भौतिकशास्त्र म्हटले कि कपाळावर आठ्याच पडतात!

खरे पाहता विज्ञान म्हणजे दैनदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टींचा उलगडा करणे. आपण गोष्ठी करत असतो , जगत असताना खूप गोष्ठी सवय म्हणून करतो , काही केल्या पाहिजे मोठी माणसे सांगतात म्हणून तशीच करतो, काही गोष्ठी एकमेकांवर अवलंबून असतात हे आपल्याला माहित असतेच, तर एखादी गोष्ट का घडली किंवा ती तशीच का घडली याचे कारणही आपल्याला माहित असते म्हणजेच प्रत्येकाला विज्ञान माहित असते. आता जेवढी आपल्याला माहिती आहे त्याचा वापर करून , विचार करून , इतरांकडून समजून घेऊन आपण एखादी नवीन गोष्टीमधील विज्ञान जाणून घेणे मात्र आपल्याला खूप कठीण जाते. का तर आपण आधीच मनाला अवघडलेल्या अवस्थेत ठेवलंय. म्हणून मग आपले मन धजावत नाही नवीन गोष्ठी शिकायला. विज्ञानातील प्रगतीच मानवाचा विकास करते आणि त्यात प्रत्येकाचा सहभाग गरजेचा आहेच.

एखादी नवीन गोष्ट जाणून घेणे म्हणजेच विज्ञान शिकणे. समजलेल्या माहितीचा वापर नवीन काहीतरी शोधण्यासाठी करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन आणि हाच दृष्टीकोन आपल्याला आपला विकास करण्यास आणि जीवनचांगल्या पद्धतीने जगण्यास मदत करते. आपण चोखंदळ बनतो, वागण्यात सामंजस्यपणा येतो, प्रत्येक गोष्ट निसर्गाच्या बाजूने विचार करून पाहतो.

विज्ञान विषय कठीण का वाटतो कारण जिथे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो तेथे वैचारिक देवाणघेवाण एका पातळीवर येत नाही म्हणून. एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा, तुम्हाला ‘चारचाकी गाडी’ ही कल्पनाच माहित नाही आहे म्हणजे तुम्ही आजतागत कधीच चारचाकी पाहिलेली नाही पण तुम्हाला दुचाकी माहित आहे. आणि अश्या काल्पनिक परिस्थितीत मी तुम्हाला तुमच्या पुढ्यात राहून चारचाकी गाडी बद्दल माहिती देत आहे. माहिती देताना मी बोललो कि चारचाकी गाडी म्हणजे त्याला एकूण चार चाके आहेत, समोरच्या बाजूला गाडी चालवणारा माणूस असेल, आतमध्ये जायला बाहेर यायला एक दरवाजा असेल, बसण्यासाठी वेगळी व्यवस्था केली असेल, इत्यादी. आता हे सर्व ऐकताना तुमची कल्पनाशक्ती जागृत होईल. आता जसे मी बोलतोय आणि जी वस्तुस्थिती आहे आगदी तशीच तुम्ही कल्पना करत असाल तर मी बोलत जाईन तसे तुम्हाला गोष्टी पटत जातील. समजा तुम्ही चालकाचे स्थान मध्यभागी गृहीत धरलात तर? गाडी ला असलेल्या चारही चाकांची जागा वेगळ्या ठिकाणी असतील अशी कल्पना केलात तर? तर मात्र समोरचा व्यक्ती जे सांगतोय आणि तुम्ही जी कल्पना केलीत त्यात तफावत होईल आणि गोष्टी पटत नसल्यामुळे आत्मसात करताना मन तयार असणार नाही आणि आपण त्ती गोष्ट समजून घ्यायला टाळाटाळ करु. अगदी अशीच गोष्ट विद्यार्थीदशेतील मुलांमध्ये रोज शाळेत शिकताना किंवा समाजात वावरत असताना घडत असते. पण वेळीच जर प्रत्येकाने, ज्यावेळी आपले मन गोष्ट आत्मसात करायला तयार नसते त्यावेळीच थोडा सारासार विचार करून मनाला एकाग्र करून घेऊन नीट लक्ष देऊन ती गोष्ट समजून घ्यायचा जर प्रयत्न केला तर या जगात अशक्य असे कुणासाठी काहीच नसेल.

म्हणून माझी प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक व्यकी ला एकच सांगणे आहे कि प्रत्येक गोष्ट नीट समजून उमजून करा.

मी माझ्या पुढील लेखा मधून विज्ञान विषयातील मुख्य करून भौतिकशास्त्र विषयातील छोट्या छोट्या संकल्पना साध्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करेन. खास करुन जे विद्यार्थी अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेत शिकत असतील त्यांच्यासाठी तर खूप उपयोगाचे असतील 

धन्यवाद!

टिप्पण्या